आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवसाला ‘धनत्रयोदशी’ किंवा ‘धनतेरस’ असे म्हणतात. या वर्षी धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर रोजी साजरी होणार आहे. या शुभ तिथीपासून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी भगवान धन्वंतरी, लक्ष्मी देवी आणि संपत्तीची देवता कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे. यंदा धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त कधी आहे? तसेच पूजेचा विधी हे सर्व काही जाणून घेऊयात…
Dhanteras 2025 या दिवशी सोने, चांदी, भांडी किंवा इतर मौल्यवान धातूच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. जर तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं किंवा चांदी खरेदी करायचे असेल तर अमृत काळात ते खरेदी करावे. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 8:50 ते सकाळी 10:33 पर्यंत अमृत काळ आहे. या काळात सोने आणि चांदी खरेदी केल्याने जीवनात सुख- संपत्तीत वाढ होते असे म्हणतात.
पूजेचा शुभ मुहूर्त – Dhanteras 2025
धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी माता आणि कुबेर देवाची पूजा करण्यासाठी सायंकाळी 07:16 ते 08:20 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल.
धनत्रयोदशीच्या पूजेची पद्धत: –
- या दिवशी देवघर स्वच्छ करावे.
- ईशान्य दिशेला चौरंगावर भगवान धन्वंतरी, कुबेर देव, लक्ष्मी देवी आणि गणपतीची मूर्ती ठेवावी.
- या चौरंगासमोर रांगोळी काढावी, दिवा लावावा.
- पूजेत कलश, धान्य, सोन्या-चांदीची नाणी, दागिने, पैसे आणि धणे ठेवावे.
- सर्वात आधी गणपतीची पूजा करावी.
- यानंतर सर्व देवांना हळद, कुंकू, अक्षता, फुल वाहावे.
- देवाला फळे, मिठाईचा नैवेद्य दाखवावा.
- खरेदी केलेल्या नवीन वस्तूही पूजेत ठेवून पूजा करावी. यानंतरच या वस्तू वापरायला काढाव्यात.
- शेवटी धूप-दीप आरती करावी.
Dhanteras 2025 यासोबत हेही महत्त्वाचे –
- धनत्रयोदशीला गायीची पूजा करणे अत्यंत पवित्र मानले जाते.
- या दिवशी घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा.
- ओम धनवंतरे नमः. आणि ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतरे: या मंत्रांचा जप करावा.
