महिला व बालविकास विभाग भरती 2023/WCD Recruitment 2023

नमस्कार मित्रांनो, महिला व बालविकास विभागा अंतर्गत पदभरती सुरू झाली आहे.तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा WCD Recruitment 2023

महिला व बालविकासा विभागा अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

ही पदभरती सातारा येथे होत आहे. तरी पात्र उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

महिला व बालविकास भूमिका

महिला व बालविकास विभागाची भूमिका ही सर्वात महत्त्वाची आहे.

हा विभाग महिला आणि मुलांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

सर्व समावेशक समाज निर्माण करण्यासाठी अटक परिश्रम करते जिथे महिला आणि मुले अडथळ्या शिवाय प्रगती प्राप्त करू शकतात

महिला सक्षमीकरण

महिलांना शिक्षण कौशल्य विकास आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या संधी देऊन त्यांना सक्षम करणे.

हा विभाग महिलांच्या कार्य बल आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतो त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती वाढवतो.

वाचलेल्यांना समुपदेशन आणि पुनर्वसन सेवा देत असतो स्त्रियांच्या बरोबर आट्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करतो.

बालकल्याण प्रचार

महिला व बालकल्याण विभाग हे ओळखतो की मुले ही समाजाच्या भविष्याची बांधणी आहेत.

म्हणूनच ते त्यांच्या सर्व समावेशक वाढ आणि विकासावर लक्ष केंद्रित करते

विभाग असुरक्षित पार्श्वभूमीच्या मुलांसह सर्व मुलांसाठी दर्जेदार शिक्षण आरोग्य सेवा पोषण आणि संरक्षणाची खात्री करतो.

पालन पोषण कार्यक्रम आणि बालमजुरीचा मुकाबला करण्यासाठी पुढाकार देखील घेतो प्रत्येक मुलाचा आनंदी आणि निरोगी बालपणाचा हक्क तो निश्चित करतो.

आव्हाने

या विभागांनी प्रगती करत असताना त्यांना अनेक आवाहनांचा सामनाही करावा लागतो

त्यांना संशोधनाची मर्यादा सांस्कृतिक अडथळे आणि विविध क्षेत्राच्या विविध गरजा पूर्ण करणे

यासारख्या आव्हानांचा ही सामना करावा लागतो या अडतळ्यावर मात करण्यासाठी शाश्वत निधी जनजागृती मोहीम आणि धोरणांची सतत मूल्यमापन आवश्यक आहे.

महिला आणि बालविकास विभाग हा देशशास्त्री पुरुष समानता आणि बालकल्याणाच्या वाटचालीत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे

महिलांचे सक्षमीकरण आणि मुलांच्या क्षमताचे पालन पोषण करण्यासाठी त्यांचे प्रयत्न दिसून येतात.

अंगणवाडी

महिला व बालविकास विभागांमध्ये सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे अंगणवाडी होय.

भारत सरकारने 1975 साली अंगणवाडी ह्या एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत चालू केल्या.आणि त्याचा उद्देश हा बालकांमधील कुपोषणाशी लढणे असा होता.

सध्या महाराष्ट्र राज्यात 108005 अंगणवाडे केंद्र आहेत.राज्यात 550 पेक्षा जास्त एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प चालू आहेत.

ज्यामध्ये 4000 वर पर्यवेक्षक आणि अंदाजे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी/ मदतनीस कार्य करत आहेत.

अंगणवाडी हे आरोग्य पोषण आणि शिक्षण विषयक योजनेचे मध्यवर्ती केंद्र आहे

त्यामध्ये गरोदर आणि उपचार चालू असलेल्या माता यांची नोंद असते त्यांची आरोग्य तपासणी त्यांच्यासाठी पोषक आहार याची नोंद ठेवली जाते.

एक वर्ष वयाखालील बालके त्यांचा पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ सेवा त्यांनाही दिली जाते॰

एक ते तीन वयोगटातील बालके त्यांनाही पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ सेवा याची माहिती दिली जाते व सर्व सेवा पुरवली जाते.

तीन ते सहा वयोगटातील बालके लसीकरण आरोग्य तपासणी पोषण आहार अनोपचारिक पूर्व शालेय शिक्षण त्यांनाही दिले जाते.

अंगणवाडी सेविका/मदतनीस
एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यात ज्या ठिकाणी नवीन अंगणवाड्या सुरू करण्यात येतील

अशा ठिकाणी यापूर्वी ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, समाज कल्याण, विभाग शिक्षण विभाग केंद्रीय राज्य समाज कल्याण सल्लागार बोर्ड यांच्या बालवाडी सुरू असतील

तेथील बालवाडी शिक्षिका बारावी उत्तीर्ण असेल तर तिला नवीन अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका या मानधनी पदावर थेट नियुक्ती देण्यात येते.

यासाठी बालवाडी शिक्षिका म्हणून तिची किमान दोन वर्ष तरी सेवा पूर्ण झालेली असावी.अशी बालवाडी अंगणवाडी केंद्र सुरू करतेवेळी कार्यरत असावी.

अंगणवाडीतील त्या सेविकेचे पद रिक्त झाले असेल अथवा त्या क्षेत्रातील नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करायचे असेल

तर त्या गावातील कार्यरत अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस सेवा जेष्ठतेप्रमाणे शैक्षणिक होता

स्थानिक रहिवाशी अट व मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून दोन वर्षाची सेवा या अटीची पूर्तता करीत असल्यास तिला अंगणवाडी सेविका म्हणून थेट नियुक्ती देण्यात येते.

अंगणवाडी मदतनीस या पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे।

अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर सरळ नियुक्तीसाठी वयोमर्यादा किमान 18 व कमाल 35 अशी राहील.

ज्या अंगणवाडी मिनी अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविकेची मदत निसाचीज्या अंगणवाडी मिनी अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविकेची मदतनीसची निवड करायची असेल

अशा अंगणवाडीमध्ये 50% पेक्षा जास्त मुली मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा बोलत असतील तर अशा अंगणवाडीमध्ये त्या भाषेची ज्ञान असलेल्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस अशा उमेदवारांनी नियुक्ती देण्यात यावी.

महिला व बालविकास विभाग भरती 2023

WCD Recruitment 2023

पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस

एकूण रिक्त पदे : 59

रिक्त जागांचा तपशील

पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता
अंगणवाडी मदतनीस5912 वी उत्तीर्ण

अर्ज सुरू करण्याची तारीख : 16.06.2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30.06.2023

मानधन : 5500/-

अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सातारा पश्चिम, केदार बिल्डिंग, पहिला मजला, हॉटेल ग्रीन फील्ड शेजारी, उत्तेकर नगर सदर बझार, सातारा 415001

WCD Recruitment 2023

अटी व शर्ती
  • अंगणवाडी मदतनीसाचे एकत्रित मानधन दरमहा 5500/- असेल.
  • अंगणवाडी मदतीस पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण आवश्यकक आहे.
  • शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक पत्राच्या व गुण पत्राच्या सत्यप्रती जोडाव्यात.
  • उमेदवार ज्या नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रात मदतनीस पदे रिक्त आहेत त्या क्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल.स्थानिक रहिवाशी असले बाबत शासनाने निश्चित केलेला पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.(आधार कार्ड / रेशनकार्ड)
  • तसेच उमेदवारांनी संबंधित नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रातील रहिवाशी असले बाबतचे स्वयंघोषणापत्र सोबत जोडण्यात यावे.
  • वयाची अट ही किमान 18 वर्ष व कमाल 35 वर्ष असावी.
  • विधवा माहिलेस वयाची अट 40 वर्ष आहे.

अर्ज करताना

  • जाहिरातीमध्ये दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज करावा अर्जात कोणतीही खाडाखोड करू नये तसेच व्हाइटनरचाही उपयोग करणे नाही तर अर्ज रद्द करण्यात येईल‌.
  • अर्ज सादर करतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी अर्ज सादर केल्यानंतर कोणतेही कागदपत्र प्रमाणपत्र घेतले जाणार नाही.
  • उमेदवाराने विवाहपूर्वीचे नाव वविवाह नंतरचे नाव या दोन्ही नावाची व्यक्ती एकच असल्यास राजपत्र किंवा 100/- सिस्टम पेपर वरील प्रतिज्ञापत्र यापैकी एक अर्ज सोबत जोडणे आवश्यक आहे याची नोंद उमेदवारांने घ्यावी.
  • उमेदवारांनी नियुक्ती करता कोणत्याही प्रकारचा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष दबाव आणण्यास प्रयत्न केल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.
  • अंतिम दिनांकानंतर आलेल्या किंवा पोस्टद्वारे उशिरा पोहोचलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अंतिम निवड झालेल्या उमेदवाराला निवड झाले बाबत कळविण्यात येईल इतर उमेदवारांना कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही.
  • अंगणवाडी मदतनीस यांना शासन नियमानुसार दरमहा मानधन देण्यात येईल.
  • शासकीय नियमानुसार एकत्रित मानधना वेळी करण्यात आलेली वाढ नियमानुसार अनुज्ञेय राहील.

जाहिरात

..

अधिकृत वेबसाइट

नमस्कार मित्रांनो,आम्ही आमच्या naukrikatta.in या वेबसाईटवर महाराष्ट्रात निघणाऱ्या सरकारी तसेच खाजगी नोकरीचे अपडेट वेळोवेळी सर्वांपर्यंत पोहोचवत असतो.तरी अशीच विविध माहिती मिळवण्यासाठी,जागांचा तपशील पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या धन्यवाद..!

पुणे जिल्हा शिक्षण मंडळ भरती 2023/PDEA Recruitment 2023

Leave a Comment